अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागात झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनीही आता सतर्क राहणे गरजेचे आहे.
आता देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील शेटेवाडी भागातील एका वस्तीवरील एक 36 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले, देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील शेटेवाडी भागातील एका तरुणाचा दोन दिवसांपूर्वी नगर
येथील विळद घाटातील हॉस्पिटलमध्ये स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल काल (बुधवार) पॉझिटिव्ह आला. बाधित रुग्णास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पाच ते सहा व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews