अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी राज्यातील नाट्य, चित्रपटगृह, कलाकेंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याचा मोठा फटका कलावंत, कामगारांसह विविध व्यवसायिकांना बसला आहे. कलाकेंद्रातील घुंगराचा नाद गेल्या सात महिन्यांपासून बंद झाल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना कामासाठी मजुरीला देखील कोणी घ्यायला तयार नाहीत.
या कलावंतांचे आरोग्य, मुले आणि वृद्ध महिला असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर ठाम मांडुन उभे आहेत तरी या सरकारने या कलावंतांचे व्यवसाय तात्काळ चालू करून त्यांच्या मुला-बाळाची आणि कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी अशी मागणी आदीवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक डॉ अरूण जाधव यांनी केली.
तालुक्यातील विविध वाद्य वाजवून व्यवसाय करणाऱ्या कलावंतांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर वाद्य आणि बासरी बजाव आंदोलन करण्यात आले. ग्रामीण विकास केंद्र जामखेड लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या
आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अॅड डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी वेगवेगळ्या पातळीवर महाराष्ट्रातील सर्व छोटे-मोठे व्यवसायांना टप्प्याटप्प्याने शासनाने शासकीय अटी घालून परवानगी देण्यात आली.
परंतु अजून बँड, मंडप, मंगल कार्यालय, बँजो पार्टी, आराधी, गोंधळी, संस्कृतीक कला केंद्र सनईवाले, हलकीवाले, ढोली बाजा, घोडेवाले, भजनी मंडळ , नाटककार, खुला तमाशा, ढोलकी वादक, वाघ्या मुरळी, तबला वादक व इतर कलाकारांना त्यांच्या कलेचा व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
कलाकार स्वतःची कला सादर करून कुटुंबाची उपजीविका करत असतात, परंतु कोरोना आणि लॉकडाऊन मुळे कलेचे सर्व व्यवसाय बंद पडले असल्यामुळे या कलावंतावर भुक बळी व उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे या कलावंतांचा व्यवसाय चालू करण्यासाठी या कलावंतांबरोबर आंदोलन करीत आहोत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved