अहमदनगर बातम्या

बाजारपेठेत करोना बाधित: महापालिकेकडून ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांवर भर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- करोना झालेला असतानाही अहमदनगर शहरातील दुकानात मालक, कामगार काम करत असल्याचे महापालिकेने उघडकीस आणले आहे.

रविवारी महापालिकेच्या आरोग्य व दक्षता पथकाने कापडबाजारातील दुकानात ‘आरटीपीसीआर’ चाचण्या केल्या यात तिघे पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

त्यांना मनपाच्या नटराज कोविड सेंटरला दाखल करण्यात आले असल्याची माहिती दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी दिली.

रूग्णसंख्या वाढत आहे. यात सर्वाधिक रूग्ण अहमदनगर शहरात आढळून येत आहे. करोना बाधित असलेले रूग्ण शहरात फिरत असून त्यांच्यापासून इतरांना बाधा होत आहे.

बाजारपेठेतील दुकानदार, कामगारही करोना बाधित असताना दुकानात थांबत आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभाग व दक्षता पथकाकडून रविवारी कापडबाजारातील दुकानात ‘आरटीपीसीआर’ चाचण्या करण्यात आल्या.

Ahmednagarlive24 Office