अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहर आणि जिल्ह्यासह महापालिका, जिल्हा परिषदमध्ये कोरोनाने शिरकाव केलाय. या शासकीय कार्यालयांपाठोपाठ आता माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना घुसलाय.
एका अधिकार्यासह सात कर्मचार्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संचालकांसह कर्मचार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय.
माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक कर्मचारी बुधवारी कोरोना बाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता
एका अधिकार्यासह सात कर्मचार्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे बाजार समितीचे मुख्य कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बाजार समितीत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती उपसभापती संतोष म्हस्के यांनी दिली.
महापालिका आणि जिल्हा परिषदेत कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाने कार्यालयात येण्यास नागरिकांवर निर्बंध घातले आहेत.
अत्यावश्यक कामासाठी येण्यार्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. प्रशासनाच्यावतीने कार्यालयांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com