अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले असले तरी गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांत तब्बल 68 जणांचा कोरोनामुळे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
तर कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव झाल्यापासून एकूण बळींची संख्या आता 1001 एवढी झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) 15, तर मंगळवारी (दि. 15) 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1001 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 875 झाली आहे. यापैकी 64 हजार 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.