अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- लोणी बुद्रूक येथील एका प्रथितयश सराफी व्यावसायिक कुटुंबातील तिघांना कोरोणाचा संसर्ग झाला. लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कोविड – १९ या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
त्यांच्या संपर्कातील ३३ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांनी दिली.
या व्यावसायिकास काल सायंकाळी त्रास जाणवू लागला असता लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कोविड तपासणी केंद्रात त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुलीचीही तपासणी केली असता
कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना प्रशासनाने लोणी येथील कोविड या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या निकटवर्तीयांची तपासणी केली असता त्या सर्वांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत.
त्यांच्या संपर्कातील ३३ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. या तिघांची आज भर पडल्याने लोणीतील कोरोना बाधितांची संख्या ७ वर पोहोचली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com