अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : श्रीगोंद्यात पुन्हा एकदा कोरोणाचा शिरकाव झाला आहे, श्रीगोंदा शहरातील दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
राशीन येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी याबाबत सांगितले
त्यातील एक पुरुष एक महिला असून साळवन देवी परिसर 14 दिवसांसाठी सील करण्याची प्रक्रिया काही वेळात सुरु होणार आहे.
दहा जणांचे अहवाल या तपासण्यात आले या पैकी आठ अहवाल निगेटिव्ह तर दोन पॉझिटिव आल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews