अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.
संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे.
काल पुन्हा नव्याने 16 जणांचे स्त्रास तपासणीसाठी घेण्यात आले असून अद्यापही 25 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. जर रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर संगमनेर नंतर श्रीरामपूर हे प्रशासनासाठी चिंताजनक ठरू शकते.
नागरिकांनी या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews