संगमनेरात 11 जणांना कोरोना,एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात नव्याने ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्याची एकूण संख्या 490 झाली आहे . तर मृतांची एकूण संख्या १८ झाली आहे.

काल शहरातील मोगलपुरा येथील 71 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान सदर मृत्यू झाला. काल आढळून आलेल्या ११ बाधितांमध्ये शहरातील घोडेकर मळा येथील 27 वर्षीय तरुण, घासबाजार येथील 55 वर्षीय महिला,

कासारा दुमाला येथील 65 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, पदमानगर येथील 24 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 20 वर्षीय तरुणी,

वडगावलांडगा येथील 36 वर्षीय महिला, संगमनेरातील देवीगल्ली येथील 18 वर्षीय तरुणी, बाजारपेठेतील 14 वर्षीय मुलगा आदींचा समावेश आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24