अहमदनगर बातम्या

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील उपकारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव शहरात उपकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्याने त्यात अटक असलेले तब्बल चार कैदी तर शहरातील अन्य ०३ असे ०७ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तर त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यात गोधेगाव,चांदगव्हाण आदी ठिकाणी कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे.

शहरासह तालुक्यात उतार येऊन आज ११ रुग्णवाढ नोंदवली आहे. कोपरगाव शहरातील उपकारागृहात पाच बराकी असून त्यांची क्षमता केवळ सहा कैदी ठेवण्याची आहे व त्यात एकूण तीस कैदी ठेवता येतात

मात्र येथे चक्क ९३ कैदी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलते आहे. याबाबत कारागृह अधीक्षक म्हणाले की,आम्ही या पूर्वी न्यायालयाच्या परवानगीने आम्ही येरवडा कारागृहात हे कैदी हलविण्याची मागणी केली आहे.

मात्र तिकडून अद्याप हिरवा कंदील आलेला नाही. यापूर्वी तर या वर्षी एप्रिल महिन्यात ४२ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Ahmednagarlive24 Office