बाहेर कोरोना, आणि शेतात बिबट्याची भिती, ग्रामस्थ झाले हतबल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरांसह जवखेडे, त्रिभुवनवाड, कासार पिंपळगाव, निवडुंगे गावांत अलीकडील काळांत कोरोनाने हातपाय पसरले आहेत,

तर तिसगाव वगळता मुळा पाटचारीचे लाभक्षेत्रांतील गावांसह कामत शिंगवे, कोपरे, पाडळी गाव परिसरांत बिबट्याचा संचार सुरू आहे.

जवखेडे हनुमान टाकळीचे सीमेवर वृद्धानदी किनारी बुधवारी साहेबराव धनवडे व दिलीप धनवडे हे मेंढ्या चारत होते. त्यावेळी दोन बिबट्यांनी हल्ला करून पाच मेंढ्यांची शिकार केली.

तीस फुटाचे अंतरावरच डोळ्यासमोर दोन बिबट्यांचा शिकारीचा थरार पाहुन धनवडे बंधुंची त्रेधा उडाली. तिसगाव शहरांतील मिरी रस्त्यावरील वैद्यकीय व्यावसायिकाचे पाठोपाठ उपबाजार

समिती आवारातील एका वैद्यकीय व्यावसायिकाचे कुटुंब कोरोनाचे सावटाखाली आहे. जवखेडे येथे एका वैद्यकीय व्यावसायिकाचे निधन झाले. कासार पिंपळगाव येथे घेतलेल्या कोरोनाचे वातावरण निवळले.

परंतु बिबट्याने लहान मुलावर मानवी वस्तीत येवुन केलेल्या हल्ल्यामुळे जनजीवन पुन्हा भयग्रस्त झाले आहे. कापुस वेचणी मुगाची शेंगा खुडणी अशी कामे सुरु आहेत.

घराचे बाहेर जावे तर कोरोनाची अन शेतात जावे तर बिबट्याची भिती यामुळे जनजीवन कोलमडले आहे.वनविभागाने तीन ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याला बिबटे देत असलेली

हुलकावणी व रोजच होणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या शिकारीने बिबट्यांची संख्या किती याबाबत उलट्सुलट चर्चा पारांवर होत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24