अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-जामखेड येथील ३१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल तीन दिवसांत पॉझिटिव्ह आले आहे. शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेचे शाखाधिकारी गेल्या १५ दिवसापासून आजारी असल्याने त्यांनी शहरातील ३ खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते
मात्र गेल्या १० ते १२ दिवसापासून शाखाधिकाऱ्यानी आजारी असल्याने बँकेत जाणे टाळले होते. त्यानंतर त्यांनी नगर येथील खाजगी लॅब मध्ये स्वब तपासणीसाठी दिला असता दि २९ रोजी त्यांना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर त्यांच्या संपर्कातील बँकेतील ६ कर्मचाऱ्यांच्या व कुटूंबातील २ अशा ८ जणांच्या जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात रॅपीड अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या होत्या.
त्यापैकी कुटूंबातील एक तर बँकेतील ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या कुटूंबातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, बँकेच्या शाखाधिकार्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सदर महिलेवर ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी दि २९ पासून बँकेचे कामकाज पूर्णपणे बंद केले आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com