महापालिकेतील विभागप्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या चार लोकप्रतिनिधीनंतर महापालिकेतील एका विभागप्रमुखाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. आता नगर शहरात करोनाग्रस्तांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

त्यातील 900 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नगर जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा चौदा हजारपर्यंत आला असून त्यात नगर शहरातील 5 हजार 120 बाधितांचा समावेश आहे.

नगर शहरात आजपर्यंत 74 जणांचा करोनाने बळी घेतल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. प्रत्यक्षात मृत्युचा आकडा शंभरीपार पोहचला आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नगर महापालिकेच्या एका विभागप्रमुखाला करोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच शहरातील एका डॉक्टरांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

काल नगर शहरात 145 जणांना करोनाची बाधा झाली. आज दुपारपर्यंत शहरातील 15 बाधितांची भर पडली. शहरात रॅपीड टेस्टींग नगर शहरात प्रशासनाकडून रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्टींग सुरू करण्यात

आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सिव्हील हॉस्पिटलमधून एक हजार किट देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर शहरात प्रथमच रॅपीड टेस्ट सुरू होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24