कोरोना सात आठ महिने राहणार निमगाव वाघा येथे भाकित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीचे संकट अजून आठ महिने राहणार असून, देशात मोठी चळवळघडू शकते,तर युध्दाची शक्यता देखील असून शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याचे भाकित नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे बिरोबा देवस्थान येथे सांगितल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्­वास सोडला. मागील वर्षी सांगितलेले भाकीत खरे ठरलेे.

देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती. या वर्षी देखील पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला.

भुसारे यांनी भविष्यवाणी होईक सांगताना म्हणाले की, युध्द होणार, लक्ष्मीला पीडा नसून, बाळाला संकट आहे. चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस आभाळ फिरेल व ज्वारीच्या पिकाला अपकार होईल. दिवाळीचे दिपान पाच ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. गायी देठाला लागून, नव तूप होणार. दिनमान काळा होईल.

कपाशीला ७ ते ९ हजार क्विं टल, सोन्याला ४० ते ५४ हजार रुपये तोळा, ज्वारी अडीच ते २ हजार ७०० रु., पर्यंतचा पुढील वर्षासाठी भाव वर्तवला. तसेच गहू, हरभऱ्यावर तांबारा रोग पडेल व गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. पुढील आषाढी कठिण जाईल व मुगराळ्याची पेर होऊन घडमोड होईल.

ज्वारी, गहू व हरभाऱ्याची पेर होऊन काही हसतेन काही रडतेन, असे भाकीत होईकात सांगण्यात आले आहे. भुसारे यांनी मागील वर्षी युध्द, नैसर्गिक संकट व रोगराईचे सांगितलेले भाकित यावर्षी खरे ठरले. भविष्यवाणी ऐकण्यासाठी नगर शहर, निमगांव वाघा,

चास, पिंपळगाव वाघा, जखणगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने आदी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24