अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने कार्य केल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागरदेवळे (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते कुर्हे यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, अय्युब पठाण, मयुर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजणे, मयुर पाखरे, सौरभ बोरुडे, सुरेश नन्नवरे आदि उपस्थित होते.
कोरोनाच्या महामारीत शहरासह जिल्ह्यात मृत्यूदर वाढला असताना स्वप्निल कुर्हे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अमरधाम येथे कोरोना रुग्णांचे अंत्यविधी केले. काहींचे घरचे देखील येण्यास तयार नसताना त्यांनी माणुसकीच्या भावनेने अंत्यविधी करण्याचे कार्य केले.
अनेक महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहून त्यांनी हे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.