अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- बऱ्याच दिवस कोरोनाला रोखण्यापासून यश मिळवणाऱ्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे.
शहारामधे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत असून यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनात महापालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे.
असा आरोप करत महापालिकेत आयएएस दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात केली अशी माहिती भैरवनाथ वाकळे यांनी दिली.
महापालिका आयुक्त सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांना सर्व कामे झेपत नसून त्यांच्यावर राजकिय दबाव असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
नागरिकांना महापालिकेकडून अपेक्षित असलेल्या आरोग्यविषयक सेवा खासगीकरण करण्याचे घाट घातले जात आहेत. महापालिकेत अधिकारी-कर्मचारीच कोरोनाग्रस्त निघाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांची तपासणी वेळेवर होत नसल्याचे वास्तव आहे असा आरोपही त्यांनी केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com