अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे सावट उग्र स्वरूपात आहे. कोरोनाने अनेक सण उत्सव यावर आपली पडछाया टाकली. परंतु आता हा कोरोना दर तीन वर्षांनी येणार्या अधिक मासावरही आपली संकट छाया टाकून बसलेला आहे.
कोरोनाचे मोठे सावट असल्याने ‘धोंडा’ खायला नकार दिला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक जावयांनी यावर शक्कल लढवत धोंड्याच्या दानाची रक्कम थेट जावयांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक मासाची (धोंडा) जावयांना आतुरतेने प्रतीक्षा असते.
सासुरवाडीला जावयांचा नेहमीच स्वागत, सन्मान तर होतो. मुलगी व जावयांची लक्ष्मी-नारायण स्वरूपात पूजा होते. हा महिना 18 ऑक्टोबरला संपणार आहे. अधिक मासात लक्ष्मी व नारायणाची आराधना केली जाते. लेक-जावयाची लक्ष्मी- नारायण स्वरूपात पूजा केली जाते.
त्यासाठी दोघांना खास आमंत्रण दिले जाते. त्यांची पूजा करतात. सोन्याचं लॉकेट व अंगठी तसेच अनारसे, बत्तासे, नारळ, सुपार्या देतात. ते सर्व चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेऊन दिवा व कुंकू लावून हे दान दिले जाते. पुरणाचा धोंडा केला जातो.
पण यंदा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने धडकी भरल्याने परजिल्हा, परराज्यांतील जावई यांनी यंदा गावी सासुरवाडीला येण्यास नकार कळवत आहेत. गावातील पारावर चर्चा रंगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. धोंड्याचा महिना आला
की जावयांना देण्यासाठी काही प्रमाणात सोने व चांदी खरेदीसाठी नेहमीचं गर्दी असते मात्र कोरोनाचे संकट असल्याने यंदा ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे सोने व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved