कोरोनाने शिर्डीतील पेरू बागांचे अस्तित्व धोक्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम 13 जुलै 2020: जिल्ह्यातील राहाता तालुका हा पेरूचे आगार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रासह इतर राज्यातही इथल्या पेरूला मोठी मागणी असते.

मात्र कोरोना संकटामुळे मागणी घटल्याने तसेच योग्य भाव मिळत नसल्याने पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर विमा कंपन्यांच्या आडमुठे धोरणांमुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत.

राहाता तालुक्यात साधारण आठ ते नऊ हजार एकरांवर पेरू बागा उभ्या आहेत. त्यामुळे पेरुचे आगार अशी या तालुक्याची ओळख बनली आहे.

इथल्या पेरूला मुंबईसह गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये मोठी मागणी असते. जुलै महिन्यात पेरूचा सिजन सुरू होतो. इथल्या पेरूला 20 किलो मागे 300 ते 400 रुपये बाजारभाव मिळतो.

मात्र कोरोना संकटामुळे मुंबई आणि गुजरात मधील अनेक बाजारपेठा बंद असल्याने पेरूची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर पिवळ्या पेरू फळावर प्रक्रिया करून विविध उत्पादने बनवून,

देश विदेशात पाठवणाऱ्या कंपन्या अद्याप बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांकडूनही मागणी नसल्याने शेतकऱ्यांचे पेरू बागेतच सडून चालले आहेत.

त्यामुळे राहाता तालुक्यातील पेरू बागांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24