अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत.
आता राहाता तालुक्यात कोरोनाने आपले पाय रोवायला सुरवात केली आहे. राहाता तालुक्यात नव्याने 23 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
या २३ पॉझिटिव्ह अहवालांत शिर्डीच्या 13 जणांचा समावेश आहे तर गणेशनगरमधील 3, वाकडी 1, नांदुर्खी 2, जळगाव 1, गोगलगाव 1, राहाता 1 साकुरी 1 असे 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
सरकारी व खाजगी लॅबच्या अहवालात 101 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित निघालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून
सुदैवाने त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत असल्याने ही मोठी दिलासादायक बाब समजली जात आहे. शिर्डीतील कोरोना बाधितांची संख्या शतकापार झाल्याने
शिर्डीकरांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला असून २ हजार २८५ रुग्ण बरे झाले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com