श्रीरामपूरमध्ये दोघांना कोरोना ; एकूण रुग्णसंख्या २२ वर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही पसरत चालले आहे.

आज आलेल्या अहवालानुसार श्रीरामपूर शहरातील एका ४२ वर्षीय व्यक्ती व अशोकनगर येथील २३ वर्षीय युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २२ झाली असून तिघांचा मृत्यू झाला. तर ३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदर ४२ वर्षीय पुरुष एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहे,

तर अशोकनगर येथील युवक औरंगाबाद येथून आला होता. त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. दरम्यान तालुक्यातील ३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत .

यामध्ये श्रीरामपूर शहरातील १०, गोवर्धन येथील १, निमगाव खैरी येथील १९, नरसाळी येथील २, बेलापूर येथील ३ असे एकूण ३५ अहवाल निगेटिव्ह आल्याने जनतेला दिलासा मिळाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24