महापालिकेच्या चार लोकप्रतिनिधींना कोरोना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- काही दिवसापूर्वी नगर शहरातील महापालिका आणि जिल्हापरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

त्यानंतर आता महापालिकेच्या चार लोकप्रतिनिधींना कोरोनाने घेरले आहे. त्यातील काही रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही घरी क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत.

महापालिकेच्या चार नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. काहीजण रुग्णालयात तर काही जण घरी उपचार घेत आहेत. सावेडी उपनगर, रेल्वेस्टेशन परिसर आणि शहराच्या मध्यवस्तीतील हे नगरसेवक आहेत.

नगरसेवकांच्या संपर्कात आलेल्या काही नातेवाईकांनाही याची लागण झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे संबंधित भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण असून

कठोर उपाययोजना करण्याबाबत आग्रही झाले आहेत.नगर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. शहरातील सर्व भागामध्ये रुग्ण आढळून येत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24