पारनेर तालुक्यातील त्या पुरुषाला कोरोना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील एका ६२ वर्षीय पुरुषाला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. हा इसम ४ दिवसांपूर्वी मुंबईहुन गांवी आला होता.

तो गावामधे आल्यावर विलगिकरन न होता घरातील 10 सदस्यांमध्येच घरात राहीला. सदर व्यक्तीला ताप आल्याने तो लोणी मावळा येथील खाजगी डाॅक्टरांकडे गेला.

त्यानंतर त्याला जास्त त्रास होवु लागल्याने तपासणीसाठी अहमदनगर येथील सिव्हील हाॅस्पीटलमधे पाठवण्यात आले. मात्र आज त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.

या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील एकुण १९ संशयितांचे श्राव तपासणीसाठी पाठवले आहेत. संशयितांचे तपासणी अहवाल येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणुन, बाभुळवाडे,

पिंपळगांव रोठा व लोणीमावळा तिनही गावे तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे जारी केले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24