अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. संगमनेरनंतर आता श्रीरामपूरमध्ये कोरोनारुग्ण वाढत आहेत.
श्रीरामपूरमध्ये काल पुन्हा वॉर्ड नं. 2 मधील तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे.
या रुग्णांमध्ये श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील 17 वर्षीय तरुण असून त्याचे संपर्कातील लोक क्वारंटाईन करण्यात आले आहेत तर दुसरा हा 48 वर्षीय इसम आहे.
तर तिसरा इसम हा 36 वर्षीय आहे. या रुग्णांच्या घरातील लोकांना ताब्यात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. अद्याप 25 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews