अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यतील कोरोना रिकव्हरी रेट सुधारला आहे. तसेच पूर्वीसारखे कोरोना बाधितांची नोंद आता होत नसली तरी देखील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही.
कारण शहरासह जिल्ह्यातील गावपातळीवर अद्यापही कोरोनाचे सक्रिय प्रकरणे समोर येत आहे. तसेच कोरोनाचा नवा अवतार आता समोर येऊ लागल्याने नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.
सुरुवातीला कोरोना बाधितांच्या आकडेवारीत अग्रेसर राहिलेला संगमनेर तालुक्यात गुरुवारी १७ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५ हजार ८९८ वर पोहोचली आहे.
दरम्यान असेच चालू राहिल्यास तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांचा टप्पा पार करेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.