कोरोना उपचार, प्रतिबंधासाठी पहिल्याच बैठकीत दहा लाखांचा निधी संकलित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचार व प्रतिबंधासाठी अकोल्यात सामाजिक योगदान अभियान सुरू करण्यात आले आहे.

पहिल्याच बैठकीत अगस्ती साखर कारखान्याच्या काही संचालकांकडून आशा कर्मचाऱ्यांना भाऊबीज म्हणून भरीव आर्थिक मदत व मास्क, सॅनिटायझर, तसेच रुग्णवाहिका देण्याचे जाहीर करण्यात आले.

जिल्हा बँकेेचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी एक हजार रुपये देणार आहेत. औषधे व आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पतसंस्था पदाधिकाऱ्यांनी दिले.

सुमारे १० लाखांची रक्कम बैठकीत उभी राहिली. जिल्हा बँकेच्या सभागृहात सर्व पतसंस्थांची बैठक घेण्यात आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व अगस्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर,

माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, बाळासाहेब भोर, महेश नवले, शरद देशमुख, अशोक आरोटे यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24