अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-या वर्षी करोना महामारीच्या जागतिक संकटामुळे श्रीक्षेत्र देवगड येथे संपन्न होणारा भगवान दत्तात्रेय जन्म सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतलेला आहे.
यंदाच्या वर्षी दत्त जन्म सोहळा अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने मंगळवार दि.29 डिसेंबर रोजी सकाळ पासून ते बुधवार दि.30 डिसेंबर रोजी सायंकाळ पर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा व नेवासा येथून श्री क्षेत्र देवगड कडे येणारे रस्ते बंद केले आहे.
देवगड देवस्थानचे मुख्य प्रवेश द्वार देवगड फाटा येथे आहे. त्या अनुषंगाने देवगड फाटा येथे मोठा फौजफाटा आहे. 7 पोलीस, 2 होमगार्ड व महिला पोलीस तैनात करण्यात आले आहे.
त्यामुळे भाविक भक्त देवगड फाटा येथूनच दर्शन घेऊन माघारी जात आहे. देवगड फाटा येथे नेवासा पोलीस निरीक्षक त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुभाष म्हस्के, राजू काळे, सुनील भोईटे, महेश हेलाडे, महिला पोलीस प्पलवी तुपे, मीनल सागळे आदी पोलीस कर्मचारी उत्कृष्ट काम निभावत आहे.
श्री क्षेत्र देवगड येथील नविन स्वागतद्वारही पूर्णपणे बंद राहील, याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. दत्त जन्म सोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये.
यासाठी दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या तसेच फेसबूकद्वारा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेऊन प्रत्यक्ष श्री क्षेत्र देवगड येथे येण्याचे टाळावे व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात येत आहे.