अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात जसजसा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तसे सोशल मिडीयावर विविध संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
कोरोना तिसर्या स्टेजला पोहोचेल असा एक संदेश अलीकडे व्हायरल झाला आहे, मात्र तो साफ खोटा असून तो नागरिकांत घबराट पसरवित आहे, हा संदेश खोटा असून यावर विश्वास ठेवू नये.
हा आहे तो फेक संदेश –
अशा प्रकारचा मेसेज अनेक ग्रुप वर जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावे आणि मा. जिल्हाधिकारी यांचे आवाहन अशा स्वरूपात फॉरवर्ड होत आहे.
अशा प्रकारचा कोणताही मेसेज या कार्यालयाने प्रसारित केलेल्या नाही. त्यामुळे अशा प्रकारे बनावट मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नये.असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews