या तालुक्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी सापडले 13 कोरोनाबाधित रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी (६२), संगमनेर खुर्द (३९), गुंजाळवाडी (५१, विठ्ठलनगर), तर शहरातील रहेमत नगर (४३), श्रमिकनगर (५७) अशा १३ रुग्णांची उचांकी नोंद शनिवारी झाली आहे.

१३ रुग्ण पुरुष असून सर्वांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कुरणमधील ११ ते ४० वयोगटातील ७ जण असून एक ६६ वर्षाचे वृद्ध आहेत.

हे सर्व रुग्ण कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत. तालुक्यात एकूण बाधितांचा आकडा १२६ वर जाऊन ठेपला आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये पुन्हा १०० टक्के लॉकडाऊनची चर्चा होऊ लागली आहे. प्रशासनाकडून या शक्यतेला मात्र दुजोरा मिळत नाही. पण व्यापारी वर्ग लॉकडाऊनसाठी स्वतःहून पुढे येण्याची शक्यता आहे.

कुरण येथील ८५ वर्षीय वृध्द महिलेने कोरोनावर मात केली. तिला शनिवारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही सुखद वार्ता समजली. मात्र, कुरण गावातच शनिवारी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने संशयित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी घरोघरी तपासणी मोहीम सुरू केली आहे. संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्वरित उपचार करण्याचे धोरण अवलंबले आहे.

त्यामुळे मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील संशयित व्यक्ती तसेच इन्फ्लुएन्झा या सारख्या आजाराची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्तींचे स्त्राव घेतले जात आहेत.

गेल्या आठवभरात ३०३ व्यक्तींचे स्त्राव घेतले आहेत. तपासणीची संख्या वाढलेली असल्यामुळे व काही अहवाल येणे बाकी असल्याने कोरोना पॉझिटीव्हची संख्या वाढू शकते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24