अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी लॉकडाऊन तथा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.
नुकतेच तेलकुडगाव ग्रामपंचायतीचे सरपंचसह ग्रामस्तरीय दक्षता समितीने गावातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.
कोरोना मुळे तेलकुडगाव येथील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तेलकुडगाव मध्ये कोरोना विषाणूमुळे प्रादुर्भाव-संसर्ग होऊन रुग्ण वाढू नये,
यासाठी उपाययोजना म्हणून सर्व चर्चा करून तेलकुडगाव मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी सहा दिवसाचा कडकडीत “जनता कर्फ्यू” ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवार दि.18 ते सोमवार दि. 24 सकाळी 6 वाजेपर्यंत कडकडीत बंद “जनता कर्फ्यू” ठेवण्यात आला असून या काळात मेडिकल, हॉस्पिटल, दूध डेअरी वगळता, किराणा दुकाने,
टपरीधारक, कृषी सेवा केद्रं, भाजीपाला या सह सर्व व्यवसाय बंद राहतील याची सर्वानी नोंद घ्यावी. सर्वानी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,
विनाकारण कोणीही फिरू नये, सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन करण्यात आले आहे.