अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कोरोना रोगाने पूर्ण जगभराला वळसा घातला आहे.पहिला कोरोना थांबत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या साथीने पण धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनमध्ये या रोगाने हाहाकार उडाला आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार,ब्रिटनमधून आता जगभरात फैलावत असलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.ब्रिटनमधून भारतात आलेल्या जवळपास २० जणांना या रोगाची लागण झाली आहे.
एम्सच्या संचालकांनी दिलेला हा इशारा भारतासाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. डॉ. गुलेरिया पुढे म्हणले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास केल्यावर अस आढळल कि पहिल्या कोरोना रोगापेक्षा हा कोरोना भयंकर आहे.
त्या कोरोनापेक्षा हा जास्त संसर्गजन्य आहे. या कोरोनावरील स्ट्रेनचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष गट स्थापन करण्यात आला आहे.कोरोनाच्या या नवीन रोगापासून बचावासाठी भारत सक्षम पावल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. त्यामुळे भारतीयांनी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगायला हवी असे त्यांनी सांगितले. भारतात कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे. कोरोना रोगाचे रुग्ण कमी होत असून ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा मृत्युदर पण कमी असून त्यासाठी योग्य वेळेत पाऊले उचलली गेली.असे असले तरी नवीन कोरोनाकडे आपल्याला दुर्लक्ष करून जमणार नसल्याचे त्यांनी सांगितले.या नवीन प्रकारापासून बचावासाठी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. भारतात याचा प्रसार होण्यापासून रोखायला हवा असे डॉ. गुलेरिया यांनी संगीतकले.