कोरोनाची पिछेहाट; तीन दिवसात सहा बाधितांची भर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कोरोनाचे प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यातच जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे.

यामुळे या महामारीचा धोका कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान नुकतेच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात तीन दिवसात सहा जण करोना संक्रमित असल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले.

गुरुवारी माळीचिंचोरा व बहिरवाडी येथे प्रत्येकी एक असे दोघे संक्रमित आढळले. शुक्रवारी तालुक्यातील सौंदाळा व बेलपिंपळगाव येथील प्रत्येकी एक असे दोघे संक्रमित आढळले. काल शनिवार दि. 16 जानेवारी रोजी नेवासा शहरातील एकजण करोनाबाधित आढळून आला.

अशाप्रकारे तीन दिवसात तालुक्यात पाच जण करोना संक्रमित आढळून आले. नेवासा तालुक्यातील आतापर्यंत एकूण करोना संक्रमितांची संख्या 2945 झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24