कोरोनाची वाढती आकडेवारी ठरतेय डोकेदुखी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.

एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा कोरोनाची आकडेवारी वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे.

संगमनेर तालुक्यात गेल्या 24 तासात प्राप्त झालेल्या अहवालात 49 जण बाधित आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात कोरोनाची वाढती आकडेवारी पुन्हा एकदा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

49 व्यक्ती करोनाबाधित आढळून आले असल्याने तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 5 हजार 248 इतकी झाली आहे. दरम्यान, प्रशासनाची धावपळ वाढली असून लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24