‘ह्या’गावात कोरोनाचा वेग वाढला ; एकाच हप्त्यात ३७ बाधित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे.

राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. तालुक्यातील लोणी खुर्द गावात मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळून येत आहेत.

सोमवारी येथे पाच जण बाधित आढळून आले. तर शेजारच्या हसनापूर मध्ये आणखी दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला. लोणीतील बाधितांची संख्या अवघ्या एक आठवड्यात 37 वर जाऊन पोहचली आहे.

सध्या गावात कसलीच उपाययोजना होताना दिसत नाही. पोलीस आणि ग्रामपंचायतींची कारवाई सुद्धा होत नसल्याने नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेच पालन होत नाही.

चेहर्‍यावर मास्क फक्त नावापुरता लावला जातो. त्यामुळे ही परिस्थिती वाढत चालल्याचे मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले. लोणी बुद्रुकमध्ये मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

सध्या देशभरात या आजाराने धुमाकूळ घातला आहे. परंतु यावर अद्याप लस नसल्याने याचे संक्रमण वाढतच आहे. अनेक देशांनी आपल्या लस अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. सर्वांचेच लक्ष आता या लशींकडे लागले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24