अहमदनगर बातम्या

कोरोनाची तिसरी लाट : दोन महिन्यात एकही मृत्यू नाही..

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच झपाट्याने रुग्णांची संख्या वाढली. परंतु मागील काही दिवसात रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. शहरात मंगळवारी २४ तासात ७८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्याचा आलेख दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढला. फेब्रुवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला. दुसरी लाट डिसेंबरअखेर आटोक्यात आली.

परंतु प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्यानंतरही आकडा आजतागायत शून्यावर आला नाही. त्यातच ओमायक्रोन या नवीन व्हेरींएंटसह तिसऱ्या लाटेने डोकेवर काढले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा शहरात झपाट्याने तिसऱ्या लाटेचा प्रसार झाला. घरोघरी सर्दी, ताप, खोकला आजाराचे रुग्ण वाढले होते. शहरात दररोज १५ दिवसांपूर्वी सरासरी पाचशे ते सातशे रुपये आढळून येत होते.

मागील काही दिवसात नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. नगर शहरात तिसऱ्या लाटेचा झपाट्याने प्रसार झाला असला तरी रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

मागील दोन महिन्यात नगर शहरात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सद्यस्थितीत १४ रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Ahmednagarlive24 Office