अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गावामध्ये ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने सतर्क होत अत्यावश्यक सेवा वगळता तेथील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १३ नागरिकांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आल्यानंतरच कान्हूर पठार येथील लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान, बाभुळवाडा येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या बाभुळवाडा व लोणीमावळा येथील १९ व्यक्तींचे कोरोना अहवाल गुरुवारी सायंकाळी निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
कान्हूर पठार येथील व्यक्ती इतर आजारावर उपचार करण्यासाठी नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना कोरोना सदृश्य त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयाने त्यांच्या घशातील स्त्राव घेउन त्याची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. संपर्कातील सर्वांचे स्त्राव घेण्यात आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews