मनपा कर्मचाऱ्यांचा आज होणार पगार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम होते. त्याची दाहकता काहीशी कमी झाली असल्याने सर्व कामकाज पूर्वरत झाली आहे.

यातच या संकटमय काळात जनतेची सेवा करणारे मनपा कर्मचाऱ्यांसाठी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मनपाचे कायम कर्मचारी पगार, सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन, मानधनावरील कर्मचार्‍यांचा पगार आज (गुरूवारी) त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश उपायुक्त व लेखापरीक्षक यांना देण्यात आले.

एकही कर्मचारी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यामुळे मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी दिली.

यावेळी नगरसेवकांचेही मानधन काढण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. मनपाची काल बुधवारी स्थायी समितीची सभा सभापती कोतकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24