अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात सध्या सरकारी कार्यालयांना लाचखोरीचे व्यसन लागले आहे. गेल्या काही दिवसातच अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे.
अशा लाचखोरांवर कारवाई केली जात आहे. नुकतेच लाच लुचपत प्रतिबंध विभागाने काल श्रीगोंदा तहसील कार्यालयात तक्रारदार यांचे कडून तीन हजारांची लाच स्वीकारलेल्या शैला राजेंद्र झांबरे यांना गुन्ह्यात अटक केली होती.
दरम्यान आज त्यांना विशेष सत्र न्यायाधीश, श्रीगोंदा चार्ज अहमदनगर शेटे यांचे समक्ष पोलीस कोठडी रिमांड मिळणे करिता हजर केले .
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी श्रीमती झांबरे यांनी तक्रारदार यांचे कडून ला.प्र.वि कडे तक्रार देणे पुर्वी स्विकारलेले चार हजार रुपये हस्तगत केले होते. स्विकारलेल्या लाचेच्या रकमेमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत चौकशी करणे.
त्यांचे राहते घराची घरझडती घेऊन अपसंपदेच्या अनुषंगाने तपास करणे इत्यादी कारणासाठी पोलीस कोठडी ची मागणी करण्यात आली. मा न्यायालयाने तपासाचे वरील कारणासाठी आरोपी झांबरे यांची सोमवार (दि.२१) पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे