बाजार समिती मधील भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटा ; शिवसेना पदाधिकाऱ्याने दिले आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. यातच शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांना काही महत्वाचे आदेश दिले आहे.

प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात येणार आहे.

नगर तालुक्यातील बाजार समिती मधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा त्यांच्या भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटा असे आदेश प्रा. गाडे यांनी दिले.

शिवसेना पदाधिकाऱ्याची आज बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांना आदेश दिला. गाडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्व संस्थांची वाट लागली आहे.

तालुका सहकारी साखर कारखाना, दूध संघ शेतकऱ्यांचा राहिला नाही. बाजार समितीची जागा विकून मोठमोठे शॉप तयार झालेले दिसतात. जागा विक्रीत कसा भ्रष्टाचार झाला आहे.

एकमेव राहिलेल्या बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे. बाजार समिती शेतकऱ्यांची बाजार समिती जिवंत ठेवायची असेल तर सत्ता परिवर्तन झाले पाहिजे.

पणनने बाजार समितीला नोटीस दिली होती, ते मुद्दे घेऊन तालुक्यातील गावोगावी जनतेसमोर जा. ते लोकांसमोर मांडा. त्याचप्रमाणे गावोगावी युवा सेनेच्या शाखा स्थापन करा असे आदेश प्रा.गाडे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.