Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाला पहिल्याच दिवशी ७५५१ प्रती क्विंटल दर मिळाला आहे. कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिनाथ महाराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महादेव पाटेकर म्हणाले की, वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत असून, कांदा, तुर, हरभरा खरेदीबरोबरच यावर्षीपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने कपाशी पिकाची नोव्हेंबर अखेरीच वेचणी पूर्ण होणार असून, वाढ खुंटल्याने उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीलाच कापसाला योग्य प्रतीचा भाव जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव देऊन कापूस खरेदी करण्यात येईल, असे पाटेकर यांनी सांगितले.
या वेळी बापुसाहेब पाटेकर, डॉ. सुधाकर लांडे, चेअरमन अनंता उकिंडे, व्हा. चेअरमन महादेव पाटेकर, देविदास पाटेकर, हसन शेख, अरुण पाटेकर, मोहन पाटेकर, गणेश कराड देविदास सांगळे, देवराव पाटेकर,
गणेश पाटेकर, संभाजी लांडे, हसंराज पाटेकर, बाळासाहेब पाटेकर, लक्ष्मण लांडे, डॉ. देविदास देशमुख, कैलास पाटेकर, गणेश गरड, आकाश साबळे, रोहन साबळे आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.