शेतजमीन वाटपाच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-शेतजमिनीच्या वाटपाच्या वादातून भेंडे येथील मनोजकुमार गायकवाड व त्यांच्या पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोजकुमार गायकवाड हे शेती करतात. घरात ते, पत्नी संध्या व मुले बसले असताना सोन्याबापू रत्नाकर गायकवाड, दीपक सोना पगारे, सचिन सोना पगारे,

अमोल आढाव आले व शेती वाटपाच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करू लागले. मोहन व संध्याला त्यांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24