प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याचे नियोजन आधीच झालेले होते.या मेळाव्यास येण्या आधीच उसतोडणी कामगारांना कारखानदारांना गरज असल्याचे सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक मानले जाते, ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे, लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 दिवस नाक दाबलेय ते तसेच ठेवा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

परंतु आता या मेळाव्याच्या आयोजकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड कामगार संघटनेचे दादासाहेब खेडकर, शिवराज बांगर, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अरुण जाधव,

अनिल जाधव, अमित भूईगल, संदीप शिरसाठ यांच्यासह इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती झाली असल्याचे देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24