अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : लाँकडाऊनचे उल्लंघन करत साईबाबांच्या चावडी जाऊन दर्शन घेतले. व समाज माध्यमांवर फोटो अपलोड केल्याप्रकरणी एका महिलेवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाविकांना दर्शनासाठी जाण्याची परवानगी नाही, असे असताना शिवप्रिया कौशिक या महिलेने २५ जुनला दुपारी सुरक्षा रक्षक व मंदिर विभागाचे ड्युटीस असलेले चार कर्मचारी यांची नजर चुकवून ते सांगत असतानाही बळजबरीने चावडी मंदिरात घुसल्या.
लाँकडाऊनचे उल्लंघन केले तसेच या ठिकाणी जाऊन दर्शन घेतल्याने व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केले होते. याबाबत शिर्डीतील युवा शिर्डी ग्रामस्थ या संघटनेने शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना नितिन अशोक कोते,
विकास गोंदकर आदींनी निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान याबाबत संस्थानचे सुरक्षा प्रमुख संजय मिठुलाल पाटणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक दिपक गंधाले तपास करत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews