अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणावेत, या कारणावरून सासरी होणाऱ्या जाचास कंटाळून पूनम अमोल कासार (२३) हिने शनिवारी सकाळी निमगाव खुर्द येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पूनमचा विवाह अमोलशी २०१९ मध्ये झाला होता. अनेक कारणावरून तिचा सासरी छळ सुरु होता.ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून ४ लाख रुपये आणावेत, या कारणावरून तिला मारहाण होत होती.
माहेरची परिस्थिती हलाखीची असल्याने पैसे दिले गेले नाही. सासरच्या जाचास कंटाळून अखेर पूनमने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. तिचा भाऊ सौरभ विलास हासे याने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल आबासाहेब कासार (नवरा), आबासाहेब नामदेव कासार (सासरा),
अलका आबासाहेब कासार (सासू, निमगाव खुर्द) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त व छळ केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणावेत, या कारणावरून सासरी होणाऱ्या जाचास कंटाळून पूनम अमोल कासार (२३) हिने शनिवारी सकाळी निमगाव खुर्द येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पूनमचा विवाह अमोलशी २०१९ मध्ये झाला होता. अनेक कारणावरून तिचा सासरी छळ सुरु होता. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून ४ लाख रुपये आणावेत, या कारणावरून तिला मारहाण होत होती. माहेरची परिस्थिती हलाखीची असल्याने पैसे दिले गेले नाही.
सासरच्या जाचास कंटाळून अखेर पूनमने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. तिचा भाऊ सौरभ विलास हासे याने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल आबासाहेब कासार (नवरा), आबासाहेब नामदेव कासार (सासरा), अलका आबासाहेब कासार (सासू, निमगाव खुर्द) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त व छळ केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved