अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-किरकोळ वाद विकोपाला गेला अनेकदा अनहोनी घटना घडते. अशीच एक घटना केडगाव मध्ये घडली आहे. घरातील कुलदैवताच्या पेटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला.
केडगावातील सोनेवाडी फाटा येथे ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आज आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी ढोल्या चव्हाण (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे मृत झालेल्याचे नाव आहे.
विकी चव्हाण याला आठ जणांनी 2 सप्टेंबरला मारहाण केल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णालयातून घरी आल्यानंतर काल विकी मयत झाला.
‘या’ आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल नारायण झेंड्या चव्हाण, रुपेश नारायण चव्हाण, (दोघे रा. केडगाव), राहुल छोट्या काळे, विपुल छोट्या काळे, शास्त्रम छोट्या काळे, (रा. शास्त्रीनगर, केडगाव), बिनाका तुरा चव्हाण,
बापकर्या इलासा काळे (रा. भोसले आखाडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मृत विकीची बहिण ताई सुरेश काळे हिने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी त्यांच्या मुलीचे पुस्तक आणण्यासाठी जात असताना त्यांना त्यांचा भाऊ विकी काळे हा बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला. काही वेळाने तो शुध्दीवर आला.
त्यानंतर त्याने मारहाण करणार्यांची नावे फिर्यादीला सांगितली. नारायण चव्हाण हा घरातील कुलदैवताची पेटी घेऊन गेला होता. त्याला विकी पेटी परत मागण्यासाठी गेला असता आरोपींनी दगड,
विटांनी मारहाण केल्याची माहिती विकीच्या बहिणीने दिली. आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानेच मारहाण केली. त्याच्या मृत्यूस तेच कारणीभूत असल्याचे सांगत ताई काळे हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved