अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : प्रशासनाची परवानगी न घेता प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिलेल्या पत्रावरून रामनाथ कोंडाजी मेमाने (७२) व डॉ. अमरिश रामनाथ मेमाने (४५) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
रामनाथ मेमाने हे १९ जूनला कोपरगावहून नाशिक जिल्ह्यातील येवले येथे गेले होते, तर डॉ. अमरिश मेमाने २३ जूनला कोपरगाव येथून नाशिकला गेले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews