राहुरी – राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल ६८ वर्षीय वृद्ध मातेची पोटच्याच मुलाने दारुच्या नशेत डोक्यात टणक वस्तुने प्रहार करुन हत्या केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील तांभेरे येथिल जगताप कंन्ट्रकशन्स या भागात ईदुबाई गोविंद लांडे, वय वर्ष ६८ व त्यांचा मुलगा राजेद्र गोविंद लांडे, वय वर्ष ४२ असे दोघे मायलेक राहत होते.
राजेद्रचे लग्न झाले असून त्याला मुलबाळ असुन त्याला दारुचे व्यसन असल्या कारणाने त्याची पत्नी हि सासरी नांदत नाही त्यामुळे तो आई बरोबर राहत आहे. राजेद्र त्याची आई इंदू बाई हे दोघे एकत्र राहतात.
काल कुठल्यातरी कारणातुन वाद झाल्याने राजेंद्र याने आई इंदुबाई हिच्या डोक्यात कुठलीतऱी टणकवस्तुने प्रहार करत त्याने आईला ठार केले.
सदर घटना ही दि. ७ ऑगस्टच्या मध्यरात्री दरम्यान घडल्याचे सुत्राकडून समजले आहे. घटना घडताच घटनेच्या ठिकाणी पोलिस उपधिक्षक राहुल मदने, पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख, स. पो. नि. सचिन बागुल सह पोलिस फौजफाटा दाखल झाला होता.
सदर घटने बाबत पोलिसात दुपार पर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे आईला ठार केल्यानंतर राजेन्द्र याने सर्व नातेवाइकांना बोलवुन आई अचानक मयत झाल्याचे सांगितले.
सर्व नातेवाईक जमले अंत्यविधीची तयारी सुरु असतांना मयत इंदुबाईच्या शरीरावर मारहाणीच्या खुना दिसल्याने तिचा खुन केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपी राजेद्र लांडे यास ताब्यात घेतले आहे.