अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- पारनेर सैनिक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी तुकाराम व्यवहारे माजी अध्यक्ष अर्जुन चौधरी मुख्य व्यवस्थापक संजय कोरडे यांच्यासह इतर 13 जणांवर बोगस लिलाव दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून शनिवारी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या बॅंकेतच आर्थिक फसवणूक झाल्याचा हा चौथा गुन्हा दाखल असल्याने शिवाजी व्यवहारे संजय कोरडे या जोडगोळीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. 14 फेब्रुवारी 2011 फिर्यादी पुरुषोत्तम नारायण शहाणे यांचे बंधू राजेंद्र नारायण शहाणे यांनी पारनेर सैनिक बँकेकडून व्यवसायासाठी सहा लाख कर्ज घेतलेले होते.
ते थकीत झाल्याने त्याची व्याजासह थकीत रक्कम 26 लाख 33 हजार रूपये इतकी झाली होती. कर्जदाराने ती रक्कम व्याजासह परतफेड केली असताना ती थकित असल्याचे दाखवून त्या कर्जापोटी तारण असलेल्या मालमत्तेचा बँकेला कोणताही अधिकार नसतानाही बँकेने बेकायदेशीर लिलाव केला.
शिवाय लिलाव प्रक्रीयाही बोगस पद्धतीने राबवून तेथे त्या वेळी हजर नसलेल्या व्यक्तीची खोटी सही करून आम्हा दोघा भावांची फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत पुरूषोत्तम शहाणे यांनी म्हटले आहे. तसेच शिवाजी व्यवहारे, संजय कोरडे, व इतरांनी संगनमत करून त्यावेळी जवळ जवळ 70 लाखाचा अपहार केला असल्याचा
आरोप पुरुषोत्तम शहाणे यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पारनेर पोलिस ठाण्यात 13 जणांविरोधात संगनमताने फसवणुक केल्याचा पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved