अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात तिरट खेळणाऱ्या २३ जणांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री जय जवान चौकात करण्यात आली.
आरोपीत अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. गणेशोत्सवात शहरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. मंगळवारी मध्यरात्री नगरच्या गुन्हे शाखेने जय जवान चौकातील हॉटेल लकीच्या बाजूला सुरू असलेल्या
बांधकामाच्या ठिकाणी छापा टाकला. तिरट नावाचा जुगार खेळताना २३ जण तेथे आढळले. काही जण पसार झाले. पकडलेल्या प्रतिष्ठितांकडून ३९ हजार ४६० रोख रक्कम, ४ लाख ४४ हजारांच्या ६ मोटारी व १३ मोबाइल असा ४ लाख
८३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजय एकनाथ अरगडे, सुनील केशव धात्रक, निखिल अशोक शहा, शिवम विजय कोकणे, रवी देवराम म्हस्के (मालदाड रोड), राजेंद्र संताजी कानवडे (निमगावपागा),
दशरथ शिवराम भुजबळ, गणेश बारकू धामणे, प्रतीक संजय कांबळे (इंदिरानगर), ओमकार सुनील गोडसे (भरीतकर मळा), शुभम दत्तात्रय काळे (मेनरोड),
नवनाथ रेवणनाथ हडवळे (गुंजाळ आखाडा), संदीप विजय शिंदे (गणेशनगर), अनिल बबन गायकवाड, राहुल लक्ष्मण हांडे (शिवाजीनगर), नीलेश अशोक काळे (कोल्हेवाडी रोड), गौरव कैलास जेधे (जेधे कॉलनी),
अजहर अन्सार खान, अमजद दाऊद सय्यद (सय्यदबाबा चौक), शुभम गोरख रहाणे (गुंजाळवाडी), सुरेश आंबादास पगारे (घुलेवाडी), गोविंद दासरी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved