अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसरींग संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला.
परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता डाळिंब बागांवर तेल्या रोगाची संक्रांत आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राहाता तालुक्यातील चोळकेवाडी, पिंप्री निर्मळ परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या रोग आढळून आल्याने सुमारे 300 हेक्टरहून अधिक बागा बाधित झाल्या आहेत.
या बागांवर कुर्हाड चालविण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. परिसरात 700 ते 800 हेक्टर डाळिंब बागांची लागवड झाली.
चांगले उत्पन्नही मिळत होते. मागील दोन वर्षांपासून परिसरात तेल्या रोगाचा शिरकाव झाला. थोडी झळ बसली मात्र चालू हंगामात या परिसरात तेल्या रोगाने मोठा उच्छाद मांडला.
300 हून अधिक हेक्टरवरील काढणीस आलेल्या डाळिंब बागांची फळे या रोगाने होत्याची नव्हती केली. एक एकर डाळिंब बाग मशागत, औषध,
खाद्य, मजुरी असा लाख ते सव्वा लाख रुपये काढणीपर्यंत खर्च येतो. तो झालेला खर्चही वाया गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com