‘त्यांची’ उत्पन्नाचे साधने बंद होत असल्याने स्टंटबाजी …?महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे टीकास्त्र

Ahmednagar News:माध्यमांशी संपर्क करून भाष्य करण्याची फॅशन झाली. वर्तमानपत्रात सतत आपले नाव यावे असे काहींना वाटते. जे आंदोलनाचा इशारा देतात त्यांचे नियमात काम सुरु झाल्याने माफियाशी संबंध उघड होत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उत्पन्नाचे साधन बंद होत असल्याने त्याचे शल्य निर्माण होत आहे. त्यांचे आंदोलनाचे इशारे केवळ स्टंटबाजी आहे. जनतेचा त्याच्याशी काही संबंध नाही. असे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले .

आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व नीलेश लंके यांनी गौणखनिज परवाने प्रक्रियेतील किचकट नियमांमुळे जिल्ह्यातील विकास कामे आणि विविध रस्त्यांची कामे ठप्प झाल्याचा आरोप केला होता.

Advertisement

तसेच याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याकडे लक्ष वेधले असता महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले कोणतेही विकास काम ठप्प झाले नाही. मात्र नियमावली करण्यात आली आहे. नियमानुसारच कामे होतील.

आत्तापर्यंत कामे नियमबाह्य व बेकायदेशीर सुरू होती. बगलबच्च्यांना सांभाळण्याचे काम सुरू होते. आता हे बंद होणार आहे. त्यामुळे काहींना त्याचा त्रास होत आहे. जनतेच्या हिताचे काम सुरू होत असल्यामुळे काहींना दुःख होतं आहे.

त्यामुळेच आता अशा प्रकारचे वक्तव्य काहीजण करू लागले आहेत. ज्यांनी इशारा दिला आहे. त्यांचे माफियांचे संबंध उघडे होत आहे. तसेच त्यांचे उत्पन्नाचे बंद होत असल्याने, अशा प्रकारचे इशारे देण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

या आंदोलनाचा व जनहिताचा कोणताही संबंध नाही, ही केवळ स्टंटबाजी आहे, काही जणांना वर्तमानपत्रांमध्ये आपले नाव छापून यावे, असे सातत्याने वाटत असते. त्यातूनच माध्यमातून भाष्य करण्याची फॅशन झाली आहे.

या शब्दात महसूल मंत्री विखे यांनी आमदार रोहित पवार व आमदार नीलेश लंके यांच्यावर नामोल्लेख न करता निशाणा साधला. विकास कामे कोणत्याही प्रकारे थांबणार नाहीत. त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करा, अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

Advertisement